Header Ads

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु Admission to ITI Maharashtra 2022

Admission to ITI Maharashtra 2022


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

Admission to ITI Maharashtra 2022

        वाशिम दि.24 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2022 सत्रासाठी प्रवेश प्रक्रीयेला ऑनलाईन पध्दतीने सुरुवात झालेली आहे. या अंतर्गत ऑनलाईन प्रवेशासाठी मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य संदिप बोरकर यांनी दिली.

         उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्यावर प्रवेश प्रक्रीया, नियमावली, प्रमाणित कार्यपध्दती पीडीएफ स्वरुपामध्ये उपलबध करुन देण्यात आलेली आहे.संस्थेत यावर्षी या जिल्हास्तरीय संस्थेमध्ये एक वर्षीय अभ्यासक्रमामध्ये बेसिक कॉस्मेटॉलॉजी,कार पेंटर, कॉम्प्यूटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, फॅशन डिझाईन ॲन्ड टेक्नॉलॉजी, फुड प्रोडक्शन, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीक ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स, केमॅनिक डिझेल व वेल्डर आणि दोन वर्षीय अभ्यासक्रमामध्ये मेकॅनिक मोटर व्हेईकल,रेफ्रीजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर टेक्नीशिअ, इलेक्ट्रीशिअन, फिटर या व्यावसायाचा समावेश आहे.

          प्रवेश घेवू इच्छित उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टिने प्रशिक्षणार्थी कुशल होतो.तरी उमेदवारांनी प्रवेशासाठी मोठया संख्येने अर्ज करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य,संदिप  बोरकर यांनी केले आहे.  

No comments

Powered by Blogger.