Header Ads

उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे रक्तपेढी सुरू करा - श्याम सवाई Start a blood bank at Sub-District Hospital Karanja

blood bank, raktpedhi

उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे रक्तपेढी सुरू करा- श्याम सवाई 

सर्व धर्म मित्र मंडळ ची जिल्हा शल्य चिकित्सक व सहाय्यक संचालक यांना मागणी 

    कारंजा लाड दि २७ - वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 22 वर्षांपासून अपघातग्रस्तांना तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळेस मदत कार्य तात्काळ देण्यासाठी तत्पर असणाऱ्या सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा च्या सास शोध व बचाव पथक चमू सर्वेनुसार लक्षात आलेल्या अहवालाप्रमाणे कारंजा लाड परिसरात होणारे अपघात वेगवेगळ्या आजाराचे वाढणारे रुग्ण त्याचप्रमाणे गर्भवती महिला यांना आणि विशेष म्हणजे सिकलसेल रुग्ण यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते.  हे रक्त उपलब्ध करण्याकरिता अमरावती बडनेरा अकोला वाशिम यवतमाळ या ठिकाणी जाऊन ते आणावे लागतात याला जवळपास दोन ते तीन तासाचा वेळ जातो त्यात गर्भवती महिला किंवा इतर रुग्णांना एवढा वेळ देणे शक्य नसल्यास त्याला मोठ्या शहरात हलवावं लागतं यात या रुग्णाचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असून बऱ्याच रुग्णांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने  ते वेगवेगळे विचार करतात. त्यामुळे कारंजा लाड येथे सन 2008 मध्ये रक्त संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे याकरिता प्रथम रक्तदान शिबीर सुद्धा सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा द्वारे आयोजित करण्यात आला होता हे रक्त संकलन केंद्र रुग्णांना उपयुक्त ठरत असला तरी यामध्ये फक्त रक्त ठेवल्या जातो  रक्त हे साठ-सत्तर किलोमीटर वरून आणावे लागते यात बराच वेळ जातो कारंजा परिसरात होणाऱ्या अपघात व नुकताच समृद्धी महामार्गाचा विचार केला असता कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे शासकीय रक्त पेढी सुरू करावी अशी मागणी सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा लाड च्या आरोग्य समितीने जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम माननीय जिल्हाधिकारी वाशिम व सहाय्यक संचालक राज्य रक्त संकलन परिषद मुंबई यांना आणि उपसंचालक आरोग्य विभाग अकोला यांना दिनांक 27 6 2022 रोजी मेल द्वारे केली आहे तसेच वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कारंजा यांच्यामार्फत ही संस्थेने पत्र पाठवण्यात आले. 

    कारंजा लाड हा परिसर चार जिल्ह्यांचा केंद्रबिंदू असून यात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे व रस्त्यांचे जाळे सुद्धा याप्रमाणेच वेगवेगळ्या आजारांच्यासाठी लागणाऱ्या रक्तांची मागणी व या ठिकाणाहून होणारे शिबिर व येथील रुग्णांना लागणारे रक्त लक्षात घेता या ठिकाणी शासकीय रक्तपेढी व्हावी ही विनंती करण्यात आली आहे. सास शोध व बचाव पथक च्या या निवेदनावर श्याम सवाई  अध्यक्ष सास आरोग्य समिती कारंजा यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.