Header Ads

पोलीस विभागाचे कार्य उंचावणार्या सेवा प्रणालीचे (Service Excellence and Victim Assistance) मा. पालक मंत्री यांचे हस्ते उद्घाटन



पोलीस विभागाचे कार्य उंचावणार्या सेवा प्रणालीचे (Service Excellence and Victim Assistance) मा. पालक मंत्री यांचे हस्ते उद्घाटन

मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात सेवा (Service Excellence and Victim Assistance)

वाशिम दिली.०२ -  प्रत्येक लहान सहान तकारींची दखल घेऊन गंभीर गुन्हयांना प्रतिबंध करणे तसेच पोलीस स्टेशनला भेटी देणाऱ्या नागरीकांना जबाबदारीपूर्वक उच्च सेवा प्रदान करणे केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देणे तसेच पोलीस विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता वाढविणे व त्यावर पर्यवेक्षण करणे हे उददीष्ट समोर ठेवून पोलीसांच्या कामकाजाचे मुल्यमापन करून पोलीसांची प्रतिमा जनमानसात उंचाविली जाईल याकरीता सेवा या प्रणालीचे कामकाज दिनांक १७ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यान्वीत करण्यात आली असुन दिनांक ०३ फेब्रुवारी पासुन वाशिम जिल्हयातील सर्व १३ पोलीस स्टेशन येथे सदर सेवा कार्यान्वीत करण्यात आली. दिनांक ०१ मे महाराष्ट्र दिनांचे औचित्य साधुन मा. पालक मंत्री शंभुराजे देसाई यांचे हस्ते सेवा कार्यप्रणालीचे (Service Excellence and Victim Assistance) उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. महोदयानी सेवा अंतर्गत चालणान्या कामकाजाचा आढावा घेताना सेवा सेलचे कार्यालयास भेट देऊन तेथील कर्मचारी यांचेशी संवाद साधाताना आत्तापर्यंत किती तकारी प्राप्त झाल्या किती तकारींचे निवारण करण्यात आले. याबाबत आढावा घेउन वाशिम जिल्हयातील अभ्यागत समाधानी असल्याचे प्रमाण ८९ टक्के असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व "अभ्यागत समाधानी असल्याचे प्रमाण १०० टक्के कसे करता येईल याकडे भर देण्याबाबत सुचना दिल्या.



आजपावेतो वाशिम जिल्हयात सेवा प्रणाली अंतर्गत एकुण ४३८३ अभ्यांगताचे नोंदी घेण्यात आल्या असुन त्यापैकी १७७६ अभ्यांगताचे नोंदीचे अभिप्राय केंद्रीकृत पर्यवेक्षकाकडुन घेण्यात आले आहेत. त्यामध्ये अभ्यागत समाधानी असल्याचे प्रमाण ८९ टकके असुन सेवा प्रणालीचे अंमलबजावणीचे अनुषंगाने पोलीस स्टेशनला येणारे १०० टक्के अभ्यांगतांचे नोंदी घेणे, असमाधानी अभिप्राय असलेल्या अभ्यांगताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवुन त्याच्या तकारीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. भविष्यात अधिक जबाबदारीने सेवा प्रणाली राबविण्याकडे भर दिला जाईल असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी यावेळी केले.

सदर कार्यक्रमाचे वेळी मा. पालक मंत्री श्री शंभु राजे देसाई यांचे सह मा. आमदार अमित झनक, मा.आमदार किरणराव सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी श्रीमती पंत प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्री जंगम सो यांचे सह मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, सहायक पोलीस अधीक्षक मेहक स्वामी पोलीस उप अधीक्षक गृह शेळके, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोउपनि शब्बीर पठाण, मपोउपनि अश्वीनी धोंगडे, सेवा कार्यप्रणालीचे कामकाज पाहणारे महिला कर्मचारी वर्षा बांगर, कोमल गाडे, पुजा मनवर हे उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.