९४ ग्रामपंचायतच्या १३७ रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक gram panchayat bye election
९४ ग्रामपंचायतच्या १३७ रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक
ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
वाशिम,दि.02(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवावयाचा प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील 7 ग्रामपंचायत, मालेगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायत, मंगरुळपीर तालुक्यात 7 ग्रामपंचायत, कारंजा तालुक्यातील 25 ग्रामपंचायत, रिसोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायत व मानोरा तालुक्यातील 29 अशा एकूण 94 ग्रामपंचायतीमधील 137 रिक्तपदाच्या पोट निवडणूका घेण्यात येणार आहे.
निवडणूक असलेल्या क्षेत्रामध्ये निवडणुक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून,आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत 9 जुन 2022 पर्यंत अस्तित्वात राहील.मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती,घोषणा मंत्री,खासदार,आमदार व संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या कालावधीत करता येणार नाही. असे ग्रामपंचायत निवडणूकीचे नोडल अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.
Post a Comment