Header Ads

टायर फुटल्याने पोलीस वाहन पलटी ८ पोलीस अंमलदार जखमी accident to police vehicle, 8 injured

 



टायर फुटल्याने पोलीस वाहन पलटी

८ पोलीस अंमलदार जखमी

वाशिम दि.०२ - वाशिम वरून कारंजा कडे शासकीय वाहनाने जात असतांना वाहन क्रमांक MH37AD3057 या वाहनाचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने सदर वाहन पलटी झाले. आज दुपारच्या सुमारास ही घटना  घडली. त्यामध्ये असलेले आठ पोलीस अंमलदार हे जखमी झाले असून जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व पोलीस अंमलदारांची प्रकृती चांगली आहे.

No comments

Powered by Blogger.