वाशिम जिल्हात पोलीस रेझींग डे सप्ताह उत्साहात साजरा - Police Raising Day celebrated in Washim district
वाशिम जिल्हात पोलीस रेझींग डे सप्ताह उत्साहात साजरा
Police Raising Day celebrated in Washim district
वाशिम दि.०३ - मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात पोलीस रेझींग डे निमीत्त वाशिम जिल्हा पोलीस दलात दिनांक ०२/०१/२०२० ते दिनांक ०८/०१/२०२० पावेतो रेझींग डे सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
त्या निमीत्ताने पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे दिनांक ०३/०१/२०२२ रोजी शाळा व महाविदयालयातील विदयार्थ्या करीता विविध सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाशिम शहरातील तुळशिरामजी जाधव महाविदयालय येथील ५० विदयार्थी सकाळच्या सत्रात तसेच दुपारच्या सत्रामध्ये सुशिलाताई जाधव विदयानिकेतन वाशिम येथील ५० विदयार्थ्यांना पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे आमंत्रीत करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमा प्रसंगी स्वत: मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह(भापोसे) यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले पोलीस हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरीक ज्या दीशेने आवाज आला त्या दीशेने नजर टाकतो कारण जेथे पोलीस तेथे काही तरी गडबड आहे हे नागरीकांनी मनात पक्के करून घेतले आहे त्यामुळे सामान्यांच्या मनात पोलीसा प्रती पुर्वग्रह दुषीत भाव निर्माण होतो परंतु हे तेच पोलीस असतात जे दुर्जनांपासुन सज्जनांचे रक्षण करतात जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा हेच पोलीस स्वत:च्या घरादारावर तुळशीपत्र ठेवुन समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी बंदोबस्तात चोविस तास तैनात असतो त्यामुळे पोलीसांना कौटुंबीक जीवन नसतेच कारण महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रिदवाक्यच आहे “सदरक्षणाय खलनिग्रहनाय".
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम येथे तुळशिरामजी जाधव महाविदयालय व सौ. सुशिलाबाई जाधव विदयालय,वाशिम येथील असे एकुण १०० शालेय तथा महाविदयालयीन विदयार्थ्यांना पोलीस आणि जनता सुसंवाद, सायबर गुन्हयांविषयी जनजागृती, कायदेविषयक सल्ला, महीला व बालकांचे अत्याचार संबधी गुन्हयांना प्रतिबंधक करण्याकरीता उपाय योजना व जनजागृती विषयक कार्यशाळा, डायल ११२ संदर्भात माहिती देण्यात आली वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती, अत्याधुनिक शस्त्राबाबत माहीती, श्वान पथकाचे व जलद प्रतिसाद पथकाचे प्रात्यक्षिक पोलीस अधिक्षक कार्यालय येथील विविध शाखामध्ये चालणारे दैनदिन कामकाजाबाबत माहीती देण्यात आली. यावेळी दोन विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले असुन त्यांनी सांगीतले की, त्यांना पोलीस खात्याबाबत खुपच त्रोटक माहिती होती या कार्यक्रमामुळे त्यांना पोलीस खात्याविषयी व त्यांच्या कामाच्या व्याप्ती विषयी माहिती झाली असुन या दरम्यान खुप नविन गोष्टीची ज्ञान मिळाले आहे.
सदर कार्यक्रमाची सांगता करतांना मा. पोलीस अधिक्षक यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विदयार्थ्यांना प्रशिस्तपत्र व भेटवस्तु दिल्या, तसेच वाशिम जिल्हयातील १३ पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळया वेळी स्वतंत्र कार्यक्रम राबविण्यात आले आहे. त्यामध्ये वाहतुक नियमन, कराटे प्रशिक्षण, कायदा व सुव्यवस्था बाबत माहिती, पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत माहिती, महिलाविरूध्दच्या अत्याचाराबाबत माहिती, निर्भया बाबत माहिती तसेच नव्याने सुरू झालेल्या डायल ११२ बाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमा करीता एकुण ६ शाळांनी सहभाग नोंदविला असुन ३०० विदयार्थी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस वर्धापण दिन कार्यक्रम हा ८ जानेवारी २०२२ पर्यंत चालु राहणार आहे.
पोलीस रेझींग डे सप्ताह चे आयोजन मा श्री. बच्चन सिंह,पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात मा.श्री.गोरख भामरे,अपर पोलीस अधिक्षक,वाशिम, पोलीस उप अधिक्षक, मुख्यालय वाशिम,पो.नि कल्याण,पोनि सायबर सेल, राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय, वाशिम यांनी कामगिरी करीत असुन रेझींग डे चा कार्यक्रम यशस्वीरित्या ८ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे.
Post a Comment