Header Ads

जे. डी. चवरे विद्यामंदिराच्या वर्गमित्रांचा स्नेह मिलन सोहळा - j d chaware classmates celebrated get together reunion


जे. डी. चवरे विद्यामंदिराच्या वर्गमित्रांचा स्नेह मिलन सोहळा 

तब्बल 33 वर्षानंतर 1988 बॅचचे,  वर्ग 10 चे विद्यार्थी, विद्यार्थीनी आले एकत्र

कारंजा  दि.१ :  जे. डी. चवरे विद्यामंदिर, कारंजा (लाड) येथील 1988 बॅचचे,  वर्ग 10 चे विद्यार्थी, विद्यार्थीनी आपल्या शाळेत तब्बल 33 वर्षानंतर एक दिवसीय स्नेह मिलन संमेलनासाठी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी आपल्या शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षकांचा हया भव्य कार्यक्रमात शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन येथोचित सत्कार करण्यात आला.  जे. डी. चवरे विद्यामंदिरचे विद्यमान प्राचार्य श्री. श्रीनिवास जोशी  कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर महावीर शिक्षण संस्था कारंजाचे उपाध्यक्ष श्री. प्रमोदभाउू चवरे, श्री. अ. ई. आठवले, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी व श्री. सूर्यप्रकाश इंगळे सर प्रमुख पाहुणे म्हणुन मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम दिप प्रज्वलीत करुन सरस्वती पुजनाने कार्यक्रमाला  सुरुवात  झाली.  श्री.  बोर्डे सर व किर्ती दर्यापुरकर यांच्या स्वागत गीताने मंचावरील मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे स्वरसुमनांनी स्वागत करण्यात आले. दिवगंत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आदरांजली वाहन्यात येवुन पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांचे भेट वस्तू देवून स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शाळेच्या प्रगतीचा व गत काळातल्या आठवणींचा आलेख मांडला. या शाळेतुन शिक्षण घेवुन आपण कसे घडलो याचेही मनोगत विद्यार्थ्यांनी मांडले. बहुतांश वक्तव्यातुन शाळेचे दिवंगत मुख्याध्यापक आदरणीय धामक्कर सरांनी शाळेसाठी कसे कष्ट केले याचा प्रत्येय येत होता. या वेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना मित्र गहिवरुन आले होते. या निमित्ताने उपस्थित विद्यार्थी व त्यांचा परिवार तसेच सन्माननीय शिक्षक या सर्वांना आपापल्या शालेय जीवनाची प्रकर्षाने आठवण होत होती.   सर्वजन आपल्या भुत काळात लुप्त झाले होते.



दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी वर्गातील आपापल्या बेंच वर बसुन शालेय जीवनातील तसेच शिक्षकांच्या आठवणींना स्मृतीपटलावर आणले. बरेच  विद्यार्थी तेहतीस वर्षाच्या कालवधीनंतर आपसात भेटत असल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलुन गेले होते. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या गुजगोष्टींना नव्याने समोर आणून गतकाळाल्या आठवणींचे आदन प्रदान केले.

कार्यक्रमा दरम्यान श्री. सुर्यप्रकाश इंगळे सर, अविनाश मुधोळकर सर, श्री. भगवंतराव शिंदे सर, श्री हिरामन गाठोडे सर, श्री. उदयकुमार दर्यापुरकर सर, श्री विजय निशानराव सर, श्री. देवलाल बोर्डे सर, श्री परमेश्व्र व्यवहारे सर, श्री. माणिकलाल गहाणकरी सर, श्री. अशोक आठवले सर, श्री. मोहन नवरे सर, श्री. अजाबराव आंधळे सर, श्री. राजकुमार खोलापुरे सर, श्रीमती उषा काळे मॅडम, श्रीमती विजया नांदगावकर मॅडम व श्रीमती संध्या गढवे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देवुन  सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात उपस्थित न राहु शकलेले श्री. अशोक मानकर सर, श्री. संतोष मिश्रीकोटकर सर व श्रीमती निता मिश्रीकोटकर मॅडम यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी जावुन  केला. सत्कार करते वेळी वातावरण भावुक झाले होते.  सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांच्या चरणावर नतमस्त्क होवुन आशीर्वाद घेतले. या वेळी शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल  शाळेचे शिक्षक श्री अजय मोटघरे यांचाही सत्कार करण्यात आला.  

कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन माजी विद्यार्थीवर्ग उपस्थित झाला होता. डॉ. आरती पचगाडे, डॉ. उमाकांत टाटर, डॉ. संदिप चवरे, माया विलायतकर, माधुरी गवारे, सविता हळदे, प्रमोद सावरकर, गिरीश जिचकार, राजेश  झंझाड, विजय बंड, नरेश पिंपरे, प्रशांत पवार, बाळु धाये, अनिल नवले, शेखर कडुकार, संतोष पवार, गजानन जाधव, उमेश शितोळे, अजित पवार, देवानंद दहापुते, गोपाल चौधरी, यशवंत ताथोड, प्रफुल साखरकर, किर्ती दर्यापुरकर, रवी शिंदे व संजय मोटघरे हे माजी विद्यार्थी आपल्या परिवारासह उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री. गजानन जाधव यांनी तर आभार प्रदर्शन श्री. गिरीश जिचकार यांनी पार पाडले. मंचाच्या व्यवस्थेचे काम शाळेचे  शारिरीक शिक्षक श्री. गहाणकरी सर यांनी बखुबी सांभाळले. कार्यक्रमासाठी शाळेचे कार्यरत शिक्षक वर्गही उपस्थित होता.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.