Header Ads

रोजगार मेळाव्यात ७९ रिक्त पदांकरीता रोजगाराची संधी - opportunity of employment 79 post for SSC, HSC, Graduate

job opportunity, Rojgar Sandhi


10 वी, 12 वी, स्थापत्य पदविका, कृषी पदविका, स्थापत्‍य पदवीधर व इतर सर्व शाखीय पदवीधर

रोजगार मेळाव्यात 79 रिक्त पदांकरीता रोजगाराची संधी

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 ते 31 जानेवारी दरम्यान

           वाशिम, दि. 21 (जिमाका) : राज्यातील नामांकीत नियोक्तांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाकडून ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जिल्हयासह राज्यातील नामांकित आस्थापना/ कंपन्यामध्ये 79 रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमदेवारांना याव्दारे प्राप्त होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील रोजगार इच्छुक उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैखणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, स्थापत्य पदविका, कृषी पदविका, स्थापत्‍य पदवीधर व इतर सर्व शाखीय पदवीधर असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री, पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजन कार्डच्या युझर नेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योजकांकडून ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने कोविड-19 च्या प्रादुर्भाव विचारात घेऊन निवड करण्यात येणार आहे.

           जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने 24 ते 31 जानेवारी 2022 दरम्यान पसंतीक्रम/सहभाग नोंदवावा. या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या 07252-231494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.           

No comments

Powered by Blogger.