Header Ads

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले - pandit dindayal upadhyay swayam yojana for Dhangar students


धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना 

28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

           वाशिम, दि. 21 (जिमाका) : अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना (pandit dindayal upadhyay swayam yojana) सुरु करण्यात आली आहे. ही योजना महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र‍ शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येईल.

              पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा. अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी मध्ये त्याला 60 टक्के गुण प्राप्त असावे. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापी दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही. अखिल भारतीय तंत्र शिक्षण  परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तूकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त विद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल.

              धनगर समाजातील इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वतीगृहात प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यानी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम या कार्यालयाकडे अर्ज करावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.