Header Ads

दि २१-०१-२०२२ : वाशिम जिल्हयातील शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार - DM order schools will be closed till next order

IAS Shanmugrajan S collector washim maharashtra


वाशिम जिल्हयातील शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार

           वाशिम, दि. 21 (जिमाका) : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्हयातील सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी आज 21 जानेवारी रोजी दिले आहे.

              ओमिक्रॉन हा नवा कोरोना विषाणूचा प्रकार जगभरात गेल्या काही दिवसामध्ये वेगाने पसरत आहे. गेल्या काही दिवसात राज्यात ओमिक्रॉन कोविड-19 ने बाधित रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही आपत्कालीन उपाययोजना करण्यात येत आहे. 8 जानेवारीच्या शासन आदेशाची निर्बंधांबाबत अधिक प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि 9 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशाने जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालये 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी दिले आहे.

               शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना दिले आहे. जिल्हयात कोविड-19 विषाणुमुळे बाधित होणाऱ्यांचा पॉझिटीव्हीटी रेट हा ग्रामीण भागात 16.89 टक्के आणि शहरी भागात 29.97 टक्के असून जिल्हयाचा एकत्रित पॉझिटीव्हीटी रेट 22.65 टक्के इतका आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्गुराजन एस. यांनी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रीया संहिताचे कलम 144 नुसार वाशिम शहरातील व जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज 21 जानेवारी रोजी दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदयातील कलमानुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.