Header Ads

वाशिम जिल्हयात फॅन्सी नंबरप्लेट आणि सायलेन्सर विरुध्द कारवाई : १६३ केसेस व ८५०००/-रूपये दंड वसुल : Action against fancy number plates and silencers in Washim district



फॅन्सी नंबरप्लेट आणि सायलेन्सर विरुध्द 3 दिवसाची विशेष मोहीम 

163 केसेस व 85000/-रूपये दंड वसुल

वाशिम दि २१ - मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन रस्ते वाहतुकीसंबंधाने अनेक उपक्रम हाती घेतले व ते यशस्वीपणे पुर्ण सुध्दा केलेले आहेत, वाशिम जिल्हयामध्ये मोटरसायकल अपघाताचे प्रमाण जास्त असुन अपघातामध्ये हेल्मेट परीधान न केल्यामुळे मृत्यू पावल्याचे संख्या अधिक आहे. सदर बाब विचारात घेवुन वाशिम जिल्हयामध्ये हेल्मेट सक्ती हा उपक्रम हाती घेवुन जे मोटरसायकल चालक हेल्मेट परीधान करणार नाही, अशा वाहन चालकांविरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई करुन जिवितहानी होणार नाही या दृष्टीकोनातुन प्रयत्न करीत आहेत.

वाशिम जिल्हयामध्ये मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह साहेब याच्या मार्गदर्शनाखाली ज्या दुचाकी वाहनांवर परीवहन विभागाने विहीत केलेल्या नमुन्या व्यक्तीरिक्त असणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट व ध्वनीप्रदुषण आणि वायुप्रदुषण करणाऱ्या दुचाकी वाहनांविरुध्द नियमानुसार विशेष मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने मागील 3 दिवसामध्ये जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर व शहर वाहतुक शाखेचे सपोनि नागेश मोहोड यांनी आपआपल्या विभागासह केलेल्या कार्यवाहीमध्ये आज पावेतो जिल्हा वाहतुक शाखेकडुन फॅन्सी नंबर प्लेटच्या एकुण- 65 केसेस व विना सायलन्सर एकुण- 26 केसेस, तर वाशिम शहरातील शहर वाहतुक शाखा यांनी फॅन्सी नंबर प्लेटच्या एकुण- 51 केसेस व विना सायलन्सर एकुण- 25 अशा कारवाई करण्यात आलेल्या असून अशा एकुण-163 विविध दुचाकी वाहनधारकांविरुध्द मोटर वाहन कायदया अन्वये केसेस करुन 85,000/- एवढा दंड वसुल केला आहे. भविष्यात सुदधा अशाप्रकारच्या वाहतुकी संबंधाने विविध मोहिम राबवुन त्याद्वारे नियमबाहय वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. 


No comments

Powered by Blogger.