Header Ads

११ वीच्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ठ योजनेकरीता ४ डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित - SHRESHTA yojana for students of 11st std



 11 वीच्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ठ योजनेकरीता 4 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

    वाशिम दि.30 (www.jantaparishad.com) - केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व समक्षिकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ठ (SHRESHTA Yojana) या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहे. SHRESHTA या योजनेनुसार विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत शिक्षण व राहण्याची सोईकरीता शाळेनुसार प्रत्येक विद्यार्थी मागे रु. 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. SHRESHTA या योजनेअंतर्गत खाजगी निवासी नामांकित शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. 

    या योजनेकरीता अर्ज या https://washim.gov.in येथून प्राप्त करता येईल.अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम या कार्यालयात किंवा ईमेल acswowashim@gmail.com या ई-मेलवर सादर करण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2021 आहे. या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.असे आवाहन नोडल अधिकारी तथा समाज कल्याणचे सहायक आयुक्त एम.जी.वाठ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी https://grants-msje.gov.in/scguidelines. या संकेतस्थळाला भेट दयावी. 

No comments

Powered by Blogger.