Header Ads

लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक - कारंजा तालुका दंडाधिकारी धिरज मांजरे यांचे निर्देश : mandatory to take both doses of the vaccine - Tahsildar Dhiraj Manjre




लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक अन्यथा होणार दंडनीय कड़क कारवाई 

कारंजा तालुका दंडाधिकारी धिरज मांजरे यांचे कड़क निर्देश 

सरकारी कार्यालय व खाजगी आस्थापना  येथील कर्मचारी तसेच खाजगी ऑटो, कार व बस चालक,  कार्यक्रमांचे आयोजक तसेच सेवा देणारे, फेरीवाले यांचे साठी विशेष  निर्देश 

कारंजा दि २९ (www.jantaparishad.com) -  मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचे 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये अंमलबजावणीच्या अनुषंगाने  मा. जिल्हाधिकारी वाशिम व मा. उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे निर्देशानुसार किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, कापड,  हॉटेल व्यवसायिक, मंगल कार्यालय व्यवस्थापक, सलून व्यवसायिक यांची सभा आज तहसील कार्यालयात तहसिलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी  यांचे उपस्थितीत घेण्यात आली.
 
  

१० ते ५० हजार रुपयांचा दंड त्यानंतर कायमस्वरूपी बंद ची कारवाई 

   सरकारी कार्यालय व खाजगी आस्थापना  येथील  कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस होणे अपेक्षित असल्यामुळे ज्या खाजगी दुकाने /अस्थापना यामध्ये लसीकरणाचे  दोन्ही डोस  न घेता कर्मचारी काम करत असल्यास दुकान चालकावर  उपरोक्त परिपत्रकानुसार सुरुवातीस रू 10000 त्यानंतर  रू 50000 व त्यानंतरही उल्लघन अढळल्यास कोरोना नियमावली अस्तित्वात असेपर्यंत कायम स्वरूपी सदर आस्थापना अथवा दुकान बंद करण्यात येईल याबाबतची माहिती देण्यात आली. 


        खाजगी ऑटो, कार व बस चालक यांनी देखील लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले.

      कोणत्याही कार्यक्रमास आयोजनाच्या ठिकाणी  सहभागी असणारे सर्व आयोजक  व त्याठिकाणी सेवा देणारे आणि उपस्थित होणारे अभ्यागत व ग्राहक यांना देखील लसीकरणाचे दोन्ही घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले.
     बैठकीस उपस्थित असणाऱ्या सर्व संघटना स्थापना यांचे पदाधिकारी यांनी पुढील तीन दिवसांमध्ये त्यांच्या दुकानांमध्ये अस्थापना मध्ये काम करत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचे पुढील 3 दिवसात  लसीकरण पूर्ण करून घेण्यात येईल याबाबत आश्वस्त केले.

      मुदत देऊनही पुढील 3 दिवसात खाजगी आस्थापना, दुकाने ,फेरीवाले, ऑटो खाजगी कार व बस चालक यांनी लसीकरण करून न घेतल्यास मा. मुख्य सचिव यांच्या आदेशाने नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. असे निर्देश कारंजाचे तहसिलदार तथा इन्सिडेंट कमांडर धिरज मांजरे यांनी दिले आहे. 

No comments

Powered by Blogger.