Header Ads

कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड घेण्याचे टाळावे - appeal by agriculturual department washim



 कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड घेण्याचे टाळावे

 कृषी विभागाचे आवाहन

वाशिम दि.30 (www.jantaparishad.com) जिल्ह्यात कापुस पिकाचे क्षेत्र 21 हजार 354 हेकटर आहे. त्यापैकी बहुतांश क्षेत्र कोरडवाहु आहे. कपाशी फरदड पिक घेण्याच्या पध्दतीमुळे शेतामध्ये कपाशी पिक‍ दिर्घकाळ राहील्याने गुलाबी बोंडअळीच्या जीवनक्रमाध्ये वाढ होण्यासाठी खाद्य मिळते. कापुस पिकाची फरदड घेण्याचे काही फायदे असले तरी तोटयाचे प्रमाण‍ अधिक आहे. 

          कापुस पिकाची फरदड घेतल्याने गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत होत नाही. परिणामत: पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होवुन अधिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. 

जिल्ह्यात मुख्यत: मानोरा,कारंजा व मंगरुळपीर या तिन तालुक्यामध्ये कपाशी पिक घेतले जाते.फरदड निर्मुलन मोहिम यशस्वी राबविण्याकरीता कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. प्रचारप्रसिध्दी,गावसभा घेवुन शेतकऱ्यांना कपाशी फरदड न घेता ज्यांच्याकडे ओलीताची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी कपशी उपटुन नष्ट करावी व रब्बीमध्ये उशीरा घेता येणारे गव्हाचे वाण पेरावे किंवा उन्हाळी भुईमुग,सोयाबिनसारखी पिके घ्यावीत.कुठल्याही परिस्थि‍तीत 31 डिसेंबरनंतर शेतात कपाशी पिक उभे ठेवू नये,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.