Header Ads

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन - Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme



वसंतराव नाईक महामंडळ  कर्ज योजना 

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme

लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन 

वाशिम, दि. 25 (जिमाका) :  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक उन्नतीकरीता शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व्यक्तींकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्यामार्फत वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना ( Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme) बँकेमार्फत कर्ज मर्यादा 10 लाखापर्यंत आणि गट कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत कर्ज मर्यादा 10 ते 50 लाखापर्यंत या दोन योजना ऑनलाईन राबविण्यात येतात. संबंधित सर्व माहिती महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळ प्रसिध्द करण्यात आली आहे. 

तरी विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासवर्गाच्या व्यक्तींनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. सादर करतांना काही अडचणी आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथील कार्यालयाच्या 7276941515 व 8668543879 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.