सॉफ्टवेअर इंजिनिअर या विषयावर 28 ऑक्टोबरला ऑनलाईन प्रशिक्षण - online training on software engineering
सॉफ्टवेअर इंजिनिअर या विषयावर 28 ऑक्टोबरला ऑनलाईन प्रशिक्षण
online training on software engineering
वाशिम, दि. 25 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील युवक-युवतींसाठी ‘बारवीनंतर लगेचच सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हा’’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन गुरुवार, 28 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे. पुणे येथील एचसीएल टीएसएस-सोर्सिंग-टेकबीचे उपव्यवस्थापक श्री. श्रीकांत सराडे हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तरी जिल्हयातील युवक-युवतींनी https://meet.google.com/pem-hamz-fpz या लिंकवर क्लिक करुन प्रशिक्षणास जॉईन करावे.
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सुचनांचे पालन करावा लागेल. https://meet.google.com/pem-hamz-fpz आपल्याकडे Google Meet App यापूर्वी Install केलेले नसेल तर Install करुन घ्यावे. आपण Google Meet App मधून कनेक्ट झाल्यानंतर वरील लिंकवरुन जॉईन व्हावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिट वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंक मधून Connect झाल्यावर लगेच आपला Video व Mike बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक unmute सुरु करुन प्रश्न विचारावे व लगेच माईक बंद करावा. प्रश्न विचारतांना मोजक्या शब्दात विचारावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे.
Post a Comment