वाशिम, दि. 25 : दुकाने व आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट व हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार - timings Shops and establishments, restaurants and hotels
दुकाने व आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट व हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार
जिल्हाधिकारी षण्मुगराज एस. यांचे सुधारित आदेश
वाशिम, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग कायदा 1897 हा 13 मार्च 2020 पासून लागू करुन तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना जारी केली आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिध्द करुन जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषीत केले आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळून आले असून त्याचा संसर्ग झपाटयाने होत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हयातील सर्व दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स इत्यादी विविध आस्थापना रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते. आता 22 ऑक्टोबर 2021 पासून वाशिम जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व दुकाने व विविध आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत तसेच रेस्टॉरंट, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत सुधारीत आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, श्री. षण्मुगराज एस. यांनी निर्गमित केले आहेत.
Post a Comment