यूपीएससीत यश संपादन करुन वाशिम जिल्ह्याचे गौरव बनलेले अनुजा व प्रणवचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन - UPSC successful candidates Anuja Musale and Pranav Thakre honored by washim DM
यूपीएससीत यश संपादन केलेल्या जिल्ह्याचे गौरव बनलेले अनुजा व प्रणवचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
वाशिम (www.jantaparishad.com) दि. २७ (जिमाका) - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील कारंजा( लाड) तालुक्यातील लाडेगाव येथील प्रणव ठाकरे आणि वाशीम तालुक्यातील ब्रम्हा येथील अनुजा मुसळे यांनी यश संपादन केले. त्यांचे या यशामुळे वाशिम जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. यूपीएससी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या अनुजा आणि प्रणव यांचे आज २७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी त्यांच्या कक्षात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दोघांचीही शैक्षणिक व कौटुंबिक माहिती जाणून घेतली. यूपीएससीची तयारी दिल्ली येथील खासगी स्पर्धा परीक्षा क्लासेसमधून केल्याचे अनुजा तसेच प्रणव यांनी सांगितले
Post a Comment