Header Ads

Navgrah Stotra Mantra Lyrics Marathi Hindi Sanskrit image jpg picture - नवग्रह स्तोत्र मंत्र पाठ

 Navgrah Stotra Mantra Lyrics image jpg picture नवग्रह स्तोत्र मंत्र पाठ



नवग्रह स्तोत्र 

Navagraha Stotram

Nav Graha Stotra 

आज आपण जे पाहणार आहोत ते आहे नवग्रह स्तोत्र (Navagraha Stotram / Nav Grah Stotra Mantra). या स्तोत्रामध्ये पृथ्वीच्या आजूबाजूला फिरणारे सुर्य, चंद्र व इतर ग्रहांना विशेष महत्व देत तसेच पृथ्वीचे दोन बिंदू हे राहू-केतू असा विचार करुन ह्यांचा महिमा गायीलेला आहे.  ह्या नऊ ग्रहांना (Nine plantest / Nav grah) देवतेचा दर्जा देण्यात आला आहे. श्री व्यासऋषींनी (Sage Vyas) लिहिलेल्या या स्तोत्रात सुर्यमालेतील नऊ ग्रहांचे वर्णन केले आहे. हे स्तोत्र म्हणजे नऊ ग्रहांचे नऊ वेगवेगळे असे मंत्रच होय. ज्योतीषशास्त्रानूसार नऊ ग्रहांचे परिणाम मनुष्याचे आयुष्यावर होत असते. उपरोक्त स्तोत्रात पहिले नऊ श्‍लोक हे नवग्रहांचे मंत्र (Navagraha Mantra / Nav Grah Stotra) होय तर उर्वरित ३ श्‍लोक हे त्या स्तोत्राची फलश्रृती होय. याचे पठणाने आपल्या अडीअडचणी दुर होऊन व्यक्तीला नवग्रहांचा आशिर्वाद (Nav graha  blessings) प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. 


अथ नवग्रह स्तोत्र।
श्री गणेशाय नमः।

सूर्य नवग्रह मंत्र
Surya Nav grah Mantra

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदद्युतिम्।
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् ॥१॥

चंद्र  नवग्रह मंत्र
Chandra Nav grah Mantra

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम् ॥२॥


मंगल नवग्रह मंत्र
Mangal Nav grah Mantra

धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम्।
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् ॥३॥

बुध नवग्रह मंत्र
Budh Nav grah Mantra

प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम्।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥४॥

गुरु  नवग्रह मंत्र
Guru Nav grah Mantra

देवानांच ऋषीनांच गुरुं कांचन सन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥५॥

शुक्र नवग्रह मंत्र
Shukra Nav grah Mantra

हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥६॥

शनी नवग्रह मंत्र
Shani Nav grah Mantra

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥७॥

राहु नवग्रह मंत्र
Rahu Nav grah Mantra

अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम्।
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥८॥

केतु नवग्रह मंत्र
Ketu Nav grah Mantra

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्।
रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥९॥


इति श्रीव्यासमुखोग्दीतम् यः पठेत् सुसमाहितः।
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति ॥१०॥

नरनारी नृपाणांच भवेत् दुःस्वप्ननाशनम्।
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् ॥११॥

ग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुभ्दवाः।
ता सर्वाःप्रशमं यान्ति व्यासोब्रुते न संशयः ॥१२॥

॥ इति श्री वेदव्यास विरचितम् नवग्रह स्तोत्रं संपूर्णं ॥

यह भी पढ़े - श्री दूर्गा चालीसा

No comments

Powered by Blogger.