प्रा.निर्मलसिंह ठाकुर ग्लोबल गोल्ड आयकॉन पुरस्कार २०२१ ने सन्मानित global gold icon award 2021 to Prof. Nirmalsingh Thakur
प्रा.निर्मलसिंह ठाकुर ग्लोबल गोल्ड आयकॉन पुरस्कार २०२१ ने सन्मानित
कारंजा (www.jantaparishad.com) दि.५ - स्थानिक लिलाई कॉलनी, भिलखेडा,कारंजा येथील रहिवासी व सध्या नरसी मोनजी विद्यापीठ मुंबई येथे कार्यरत, आदीशक्ती महिला बहुउद्देशिय संस्थेचे संचालक, करीयर मार्गदर्शक प्रा.निर्मलसिंह ठाकुर (Prof. Nirmalsingh Thakur) यांना ग्रामीण शाळा,विद्यार्थी, युवक आणि महीलांकरीता विविध ऊपक्रमांव्दारे करीत असलेल्या सामाजिक कार्यासाठी ग्लोबल गोल्ड आयकॉन-2021 (global gold icon award 2021) हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल गोल्ड टँलेंट बुक ऑफ रेकॉर्ड द्वारे खारघर,नवी मुंबई येथील हॉटेल थ्री स्टार मध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिनी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, माजी शिक्षण ऊपसंचालक सुरेश माळी आणि झी मेडीया नेटवर्क च्या पञकार, वृत्तनिवेदीका अनुपमा खानविलकर-शितोळे हे मान्यवर प्रमुख अतिथि म्हणून ऊपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रा. निर्मलसिंह ठाकुर यांना सामाजिक कार्य क्षेञासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना प्रा. निर्मलसिंह ठाकुर म्हणाले की आदीशक्ती महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने विद्याश्री शिष्यवृत्ती, क्रांतिज्योती साविञीबाई फुले पुस्तकपेढी योजना,आदीशक्ती पुरस्कार, कौशल्य विकास,करीयर मार्गदर्शन अशा विविध योजना राबविण्यात येतात.या योजनांच्या माध्यमातून 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी, युवक आणि महीलांना लाभ मिळाला आहे. देश विदेशातील दानशुर व्यक्तिंनी सढळ हस्ते केलेल्या मदतीमुळे आणि विविध शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षकांमुळेच गेल्या आठ वर्षांपासून संस्थेचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. संस्थेच्या अध्यक्षा कविता ठाकुर, संचालक मंडळ,संस्थेचे कार्यक्रम समन्वयक ,संस्थेच्या योजना सुरू असलेल्या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या सहकार्यांनेच हे सामाजिक कार्य सुरू आहे. या सर्वांच्या एकञित मेहनतीचे फळ म्हणून हा पुरस्कार मी स्विकारतो आहे तसेच हा पुरस्कार आम्हा सर्वाँना भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल असे मत व्यक्त केले.
Post a Comment