Header Ads

माळी समाजातील 90 गुणवंताचा 90 scolar student honoured


 

माळी समाजातील 90 गुणवंताचा  सत्कार

वाशीम जिल्हा माळी कर्मचारी सेवा तालुका शाखा कारंजाचे आयोजन

कारंजा (www.jantaparishad.com) दि ०५ - वाशीम जिल्हा माळी कर्मचारी सेवा तालुका शाखा कारंजा चे विद्यमाने कारंजा तालुक्यातील माळी समाजातील 90 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.04 सप्टेंबर रोजी कारंजा नागरी सहकारी पतसंस्था सभागृह येथे दुपारी 3.30 वाजता संपन्न झाला.  


            20 वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेला सोहळा गेल्या वर्षी कोरोणामुळे घेता आला नाही त्यामुळे यावर्षी 2020 व 2021 या दोन्ही वर्षातील विद्यार्थ्यांचं सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा स्थानिक कारंजा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. शाम गाभणे अध्यक्ष जिल्हा परिषद वाशीम उपस्थित होते. प्रा.रविंद्र देशमुख सेवानिवृत्त प्राचार्य जामखेड महाविद्याल जामखेड जि.अहमदनगर, सत्यनारायण भड चार्जमन शासकीय तंत्रनिकेतन वाशीम,कारंजा पंचायत समिती सदस्य विशाल घोडे, किशोर ढाकुलकर,नगर परिषद सदस्य कारंजा नंदाताई किशोर जिचकार, सामाजिक कार्यकर्ते रामदासजी भोने, विजय शामसुंदर,श्रीकृष्ण बोळे जिल्हाध्यक्ष वाशीम, जिल्हा माळी कर्मचारी सेवा मंडळ, मधुकरराव इंगळे, भालेराव साहेब  हे उपस्थित होते.       

     कार्यक्रमाची सुरुवात संत सावता महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण बोळे यांनी केले. 

        यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सत्यनारायण भड यांनी म्हटले की आज आधुनिक काळात यशप्रात्तीसाठी विविध अडचणींना समोर जावे लागत असून त्यावर मात करण्याचा मार्ग म्हणजे कठोर परिश्रम व सकारात्मक मानसिकता होय. यावेळी प्रा.रवींद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम तथा व्यवसायिक अभ्यासक्रमांकडे वळण्याचा सल्ला दिला.अध्यक्ष स्थानाहून बोलतांना डॉ.शाम गाभणे यांनी म्हटले की विद्यार्थ्यांनी परिवर्तनाची कास पकडुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. यावेळी, विजय शामसुंदर भालेराव मॅडम यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकांमधून विजय गोमासे यांनी तर विद्यार्थ्यांनमधून कु.चारू जगन्नाथ बंगाळे हिने आपले विचार मांडले. म.फुले दत्तक पालक योजने अंतर्गत 4 विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. वर्ग 10 वी 12 तसेच इतर क्षेत्रांतील 90 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते रोख रक्कम प्रमाणपत्र गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जादूटोणा विरोधी कायदा समितीवर अशासकीय सदस्य म्हणून विजय भड यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी 2020-2021 या दोन्ही शैक्षणिक वर्षातील ग्रामीण तथा शहरातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेंबळा शिवण उंबडा, कुपटा, दापुरा, कामरगाव यांसह कारंजा शहरातीत विदयार्थी पालक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे संचलन अनुप डहाके, विशाल वैध यांनी केले आभार हेमंत पापळे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता परमेश्वर व्यवहारे ,योगेश्वर शामसुंदर,गिरीश जिचकार, राजेंद्र शामसुंदर, विजय भड, विशाल वैद्य,, विवेक वासनकर,कुणाल पापळे यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.