युवक-युवतींसाठी उद्योग सुरु करण्यासाठी 01 ऑक्टोबर रोजी मोफत वेबीनार - free webinar for youth entrepreneur
युवक-युवतींसाठी उद्योग सुरु करण्यासाठी 01 ऑक्टोबर रोजी मोफत वेबीनार
वाशिम, दि. ३० (जिमाका) : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ‘उद्योजकता एक व्यावसायिक पर्याय आणि लघुउद्योग सुरु करण्यासाठी शासनाच्या विविध योजना’ या विषयावर शुक्रवार, 01 ऑक्टोबर 2021 रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी या वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
‘उद्योजकता एक व्यावसायिक पर्याय आणि लघुउद्योग सुरु करण्यासाठी शासनाच्या विविध योजना’ या विषयावरील ऑनलाईन वेबीनारमध्ये शुक्रवार, 01 ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत प्रकल्प अधिकारी एमसीईडी, शशिकांत कुंभार आणि व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली श्री. अतुल पवार मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांना https://www.facebook.com/MaharashtraSDEED या फेसबुक आणि https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या यु-ट्यूब लिंकच्या सहाय्याने वेबीनरमध्ये सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींना या सत्रात सहभागी होण्यामध्ये काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
Post a Comment