8 ऑक्टोबरला वाशिम येथे बॉईज स्पोर्टस कंपनीसाठी क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन - Sports aptitude tests for Boys Sports Company
8 ऑक्टोबरला वाशिम येथे बॉईज स्पोर्टस कंपनीसाठी क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन
डायव्हिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सींग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टींग आदी खेळांबाबत होणार चाचणी
वाशिम (www.jantaparishad.com) दि. 01 (जिमाका) : जिल्हयात आंतरराष्ट्रीय व ऑलींपीक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतीभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगीरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि आर्मी स्पोर्ट इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त वतीने बॉईज स्पोर्ट कंपनी पुणे येथील प्रवेशासाठी क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे करण्यात आले आहे.
डायव्हिंग या खेळ प्रकारात 8 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांची चाचणी घेण्यात येणार आहे. याचे संयोजक धनंजय वानखेडे (9822699953) हे आहेत. ॲथलेटिक्स या खेळ प्रकारासाठी 10 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांची चाचणी घेण्यात येईल. या चाचणीचे संयोजक बाळासाहेब गोटे (9604222005), बॉक्सींग या खेळ प्रकारात 10 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांची चाचणी घेण्यात येणार असून रणजीत कथडे (9822083873) हे चाचणीचे संयोजक आहे. कुस्ती या खेळ प्रकारासाठी 10 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या चाचणीसाठी प्रल्हाद आळणे (9822002999) हे संयोजक आहे. तलवारबाजी या खेळ प्रकारातील 10 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी संदेश पवार (8208848244) हे संयोजक आणि वेटलिफ्टींग या खेळ प्रकारासाठी धनंजय वानखेडे हे चाचणी संयोजक आहे.
चाचणीच्या दिवशी 8 ऑक्टोबरला मुलांनी चाचणीला येताना खेळाडूंना लागणारे आवश्यक साहित्य त्यांनी स्वत: सोबत घेवून यावे. निवड चाचणीच्या ठिकाणी जन्माच्या दाखलासह आधारकार्ड सादर करणे अनिवार्य आहे. या चाचणीसाठी नियंत्रक म्हणून क्रीडा विभागातील किशोर बोंडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर हे असतील. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.
Post a Comment