वाशिम जिल्हयाची हंगामी पैसेवारी 50 पेक्षा जास्त - Seasonal percentage of Washim district is more than 50
वाशिम जिल्हयाची हंगामी पैसेवारी 50 पेक्षा जास्त
वाशिम (www.jantaparishad.com) दि. 30 (जिमाका) : जिल्हयातील सन 2021-22 या वर्षाकरीता खरीप हंगामातील प्रमुख पीकांची हंगामी अर्थात नजरअंदाज पैसेवारी सर्व तहसिलदार यांचेकडून प्राप्त झाली आहे. जिल्हयातील एकूण 793 महसूली गावांपैकी 793 गावांची खरीप हंगामाची हंगामी अर्थात नजरअंदाज पैसेवारी 50 पेक्षा जास्त सरासरी 70 इतकी काढण्यात आली आहे.
वाशिम तालुका : 131 गावे, पैसेवारी काढण्यात आलेल्या गावांची संख्या 131, पीकाखालील क्षेत्र 60 हजार 342 हेक्टर, पैसेवारी 71.
मालेगांव तालुका : 122 गावे, पैसेवारी काढण्यात आलेल्या गावांची संख्या 122, पीकाखालील क्षेत्र 55 हजार 739 हेक्टर, पैसेवारी 68.
रिसोड तालुका : 100 गावे, पैसेवारी काढण्यात आलेल्या गावांची संख्या 100 , पीकाखालील क्षेत्र 56 हजार 580 हेक्टर, पैसेवारी 70.
मंगरुळपीर तालुका : 137 गावे, पैसेवारी काढण्यात आलेल्या गावांची संख्या 137, पीकाखालील क्षेत्र 47 हजार 277 हेक्टर, पैसेवारी 71.
कारंजा तालुका : 167 गावे, पैसेवारी काढण्यात आलेल्या गावांची संख्या 167, पीकाखालील क्षेत्र 54 हजार 295 हेक्टर, पैसेवारी 74.
मानोरा तालुका : 136 गावे, पैसेवारी काढण्यात आलेल्या गावांची संख्या 136, पीकाखालील क्षेत्र 41 हजार 343 हेक्टर, पैसेवारी 66.
जिल्हयातील 793 गावातील एकूण 3 लाख 15 हजार 576 हेक्टर पिकाखालील क्षेत्राची खरीप हंगामाची हंगामी अर्थात नजरअंदाज पैसेवारी सरासरी 70 पैसे इतकी काढण्यात आली आहे.

Post a Comment