Header Ads

न्यासाचे नामफलक मराठी भाषेत लावणे आवश्यक - nameplate of the trust should be in Marathi language



न्यासाचे नामफलक मराठी भाषेत लावणे आवश्यक

वाशिम, दि. ०२ (जिमाका) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणी झालेले न्यास हे त्यांचे नामफलक हे मराठी भाषेमध्ये लावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक मभावा-२०१९/ प्र.क्र.६६/भाषा-२ मंत्रालय, मुंबई यांचेकडील ६ नोव्हेबर, २०२० च्या परिपत्रकानुसार न्यासांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लावणे आवश्यक आहे.

राज्यातील सर्व नोंदणीकृत न्यासांचे विश्वस्त/पदाधिकारी यांनी त्यांच्या न्यासाचा नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागामध्ये लावावा. राज्यातील सर्व धर्मादाय सह आयुक्त, धर्मादाय उप आयुक्त, सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी सदर परिपत्रकानुसार दिलेल्या निर्देशांबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त प्र. श्रा. तरारे यांनी दिले आहेत.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.