आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन - Logo design Competition for International Sports University maharashtra
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन
Logo design Competition for International Sports University maharashtra
वाशिम, दि. ०२ (जिमाका) राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (लोगो) Logo design Competition for International Sports University maharashtra ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, यास्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे. या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्याकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन, नोकरीच्या जास्तीत संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसाईक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी बोधचिन्ह स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेऊ शकतात. तसेच या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२१ आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार रुपये, ३० हजार रुपये व २० हजार रुपये पारितोषिक प्रदान करण्यात येणार येणार आहे, असे श्री. उप्पलवार यांनी कळविले आहे.
Post a Comment