लोक न्यायालयात एकाच दिवशी १०५४ प्रकरणे निकाली - 1054 cases were settled in the LOK Adalat on the same day
लोक न्यायालयात एकाच दिवशी १०५४ प्रकरणे निकाली
वाशिम, दि. ०२ (जिमाका) : १ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनूसार प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पध्दतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवशीय लोक न्यायालयात जिल्हयातील न्यायालयात प्रलंबित असलेली ९९७ व दाखलपूर्व ५७ प्रकरणे अशा एकूण १०५४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती शैलेजा सावंत व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संजय शिंदे यांनी जिल्हयातील ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच दाखलपूर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता या लोक न्यायालयात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवून जिल्ह्यातील १०५४ प्रकरणांचा १ ऑगस्ट रोजी सामोपचाराने निपटारा करण्यात आला. न्यायालयात प्रलंबित एकूण ९९७ प्रकरणांचा तसेच दाखलपूर्व ५७ प्रकरणे असे एकूण १०५४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ४ कोटी ५९ लक्ष ९१ हजार ४४८ एवढया रक्कमेचे प्रकरणे या लोक न्यायालयात निकाली निघाले. यापूर्वी घेण्यात आलेल्या लोक अदालतीपेक्षा १ ऑगस्टच्या लोक अदालतीत उच्चांकी प्रकरणांचा निपटारा झाला आहे. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे आणि जिल्हा पोलीस दलाचे सहकार्य मिळाले.
Post a Comment