Header Ads

नाग पंचमी २०२१ माहिती मराठी - Nag Panchami 2021 marathi mahiti, wishes, shubhecha

nag panchami, 2021, marathi, hindi, wishes, shubhecha, mahiti

नाग पंचमी २०२१ 
Nag panchami 2021 
पुजन विधी, मंत्र व विशेष 
Puja, Vidhi, Mantra, Stotra

nag panchami kab hai 2021 date?

नाग पंचमी २०२१ : १३ ऑगस्ट
पूजा मुहुर्त : ०५.३२ ते ७.०८
पंचमी तिथी प्रारंभ : १५.२७ (१२ ऑगस्ट)
पंचमी तिथी समाप्ती : १३.४४ (१३ ऑगस्ट)

नाग-गायत्री मंत्र (Nag Gayatri Mantra)

कालसर्प दोष निवारण तसेच राहु ग्रहाचे शांतीसाठी नाग-गायत्री मंत्र पठन केले जाते. 
ॐ नवकुलाय विद्मये विषदंताय धिमहि तन्नो सर्प: प्रचोदयात् 

नाग पंचमी ची विशेषता - Nag Panchami Speciality

हिंदू धर्मात देवी-देवता, संत-महात्मे यांचीच नव्हे तर पशु, पक्षी, प्राणी तसेच वृक्षांचीही पुजा केली जाते. जगातील प्रत्येक घटक हा किती महत्वाचा आहे, हे या पुजा माध्यमांद्वारे सामान्य माणसांना पटवून देणारे एक शास्त्र म्हणजे ही पुजा पद्धती होय. याचा एक भाग म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा नागपंचमीचा उत्सव (nag panchami festival). 
होय, नागांना देवतेचा दर्जा देण्यात आलेला आहे. अनेक जातींमध्ये तर नागांचे रुपात पितरांचीही पुजा करण्याचा प्रघात आहे. नागपंचमीचा उत्सव हा आपल्या देशात सर्वच भागात साजरा केला जातो.  पंचमीचा प्रारंभ, समाप्ती व पुजन काळ हे वर दिले प्रमाणे आहेत. 
nagpanchmi 2020 नाग पंचमी चित्र nag panchami image kab hai nag devta, naag dev

नाग हे देवाधीदेव महादेव Mahadev  यांच्या कंठाची शोभा वाढवितात तर दुसरीकडे जगाचा पालनकर्ता म्हणजेच भगवान विष्णूं vishanu यांना शैय्या प्रदान करण्याचे कार्य करतात. महादेवाचे कंठात हार म्हणून नागराज वासूकी Nagraj Vasuki  तर भगवान विष्णूची शैय्या म्हणून शेषनाग Sheshnag हे आपले कर्तव्य पार पाडतो. म्हणूनही पंथ कोणताही असो शैव किंवा वैष्णव नागांची पुजा ही प्राचीन काळापासून केली जाते. 
नागदेवता Nag Devta  हे जमीनीत राहतात, श्रावण महिना सुरु झाल्यावर हे जमीनीचे पृष्ठभागावर येतात. श्रावण महिन्यात  देवाधीदेव महादेव यांची पुजा केली जाते. आणि महादेव हे नागदेवतांंचे आदीदेव आहेत म्हणूनही नागपंचमी श्रावण महिन्याचे पंचमीला साजरा केली जाते. तसेच पंचमी ही महिन्याची कोणतीही असो, त्याचा अधिपती हे नागदेवतेलाच मानले गेले आहे. 

नागपंचमी पुजा, पद्धती व उपवास 

(nag panchami pooja)

नागपंचमीचे दिवशी नागांची पुजा (nag panchami puja) करतात. अनेक भावीक भक्त हे वारुळांवर, नागदेवतांचे किंवा महादेवाचे मंदिरात जाऊन पुजा अर्चना करतात. महाराष्ट्रात जवळपास प्रत्येकच गांवात कोठे गावात तर कोठे एखाद्याचे घरी ठाणा म्हणून नागठाणा म्हणून हे नागदेवतेचे पुजाचे विशेष स्थान असतेच. ज्यांच्या घरी नागठाणा असतो, त्यांचे येथे कर्तापुरुषाचे कानात नागदेवतेचे चांदीचे अथवा सोन्याचे डुल दिसून येतात. हा एक कुळाचाराचाच भाग होय. नागपंचमीचे दिवशी अशा विविध  ठिकाणी जाऊन भावीक भक्तगण आपले श्रद्धानुसार पुजा अर्चा करतात. काही भावीक हे कोर्‍या कागदावर नागांचे चित्र रेखाटून त्यांची पुजा करतात. विशेष करुन दुध (गरम न केलेले), लाही व फुटाणे हे नैवेद्य म्हणून ठेवण्यात येते. अनेक भावीक ह्या दिवशी आपले कुळाचारानुसार उपवासही करतात. 

नाग देवता व ज्योतीष (Nag Devta aur Jyotish)

नाग व ज्योतीष यांचा खुपच जवळचा संबंध आहे. कुंडलीत असलेल्या Kalsarp Dosh कालसर्प दोष मुळे तर व्यक्तीची घाबरगुंडीच उडते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील महादेवाचे महत्वाचे ज्योतीर्लिंग असलेले त्र्यंबकेश्‍वर येथे या दोषाचे निवारण हे कालसर्प पुजेद्वारे केले जाते. कालसर्पाचे मुख्यत्वे १२ प्रकार आहेत. कुंडलीत राहु व केतू हे समोरा समोर असतातच मात्र जेव्हा कुंडलीतील प्रत्येक ग्रह हा त्यांच्या एकाच बाजूने येतात, त्यावेळेस ती कुंडली कालसर्प दोष पुर्ण आहे असे मानले जाते. नागांना मारल्यामुळे पुढे होणार्‍या जन्मांमध्ये हा रोग कुंडलीत येतो असे म्हटले जाते. 

नाग पंचमी चे दिवशी जमीन उत्खनन करणे निषिद्ध 

नागांना देवता मानले जाते व त्यांचे निवास हे जमीनीत बिळांमध्ये किंवा वारुळांमध्ये असते. त्यामुळे नागपंचमीचे दिवशी जमीन उत्खनन केले जात नाही. तसेच नागपंचमीचे दिवशी अनेक भावीक हे डाळ व तांदुळ यांचाही जेवणात उपयोग करीत नाहीत. 

हे ही वाचा - नवनाग स्तोत्र (Nav Nag Stotra) 

No comments

Powered by Blogger.