Header Ads

स्वातंत्र्य दिनाचे औचित्यावर LIC चे वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन - Blood Donation Camp by LIC on Independence Day Free blood group testing camp


कारंजा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्यावर LIC चे वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 

सोबतच मोफत रक्तगट तपासणी शिबीरही 

कारंजा दि.१४ - गरजू अशा सामान्य रुग्णाला तात्काळ रुपात रक्तपुरवठा व्हावा या उदात्त हेतूने स्वातंत्र्य दिनाचे औचित्यावर कारंजा येथे १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरहू रक्तदान शिबीर (Blood Donation Camp) हे १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत कारंजा येथे LIC हफ्ता भरणा केंद्र, सिटी हब कॉम्प्लेक्स, मंगरुळ रोड, बायपास येथे होणार आहे. शासकीय रक्तपेढीला हे रक्तदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी आपणास आपले रक्तगट जाणून घ्यावयाचे असल्यास मोफत रक्तगट तपासणी (Free blood group testing camp) ही केली जाणार आहे. या उपक्रमाचे आयोजन LIC चे सिनीअर बिझनेस असोसिएट श्री. प्रतिक ठाकरे यांच्या पुढाकाराने समस्त LIC परिवार वाशिम जिल्हा शाखा चे वतीने करण्यात आले आहे. 

थालासेमिया, सिकलसेल, हिमोफेलिया या आजाराच्या रुग्णांना दर पंधरा दिवसाला रक्त द्यावे लागते. असे आपल्या वाशिम जिल्ह्यात एकूण १६० रुग्ण आहेत त्या रुग्णांना तसेच गरोदर माता यांना सुद्धा शासकीय रक्तपेढी मार्फत मोफत रक्तपुरवठा केला जातो. तसेच इतर रक्त गरजू रुग्णांना जे रुग्ण खाजगी हॉस्पिटलला असतील तर त्यांच्याकडे किंवा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे आपल्या शासकीय रक्तपेढीचे रक्तदान केल्याचे रक्तदाता कार्ड असले तर त्यांना सुद्धा मोफत रक्तपुरवठा केला जातो. शासकीय रक्तपेढीला दर दिवसाला २५-३० रक्तपिशव्या रक्तपुरवठा करावा लागतो आहे. त्यामुळे हे रक्त त्या गरीब गरजू रुग्णाला मिळावे याकरिता जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करुन शासकीय रक्तपेढिला सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी श्री प्रतिक ठाकरे, मोबाइल क्रमांक - 9420303031 वर संपर्क साधता येईल.

रक्तदान कोण करु शकतो ?

Who can donate Blood ? 

* प्रत्येक निरोगी व्यक्ती रक्तदान करु शकतो. 

* रक्तदान करण्यापुर्वी जेवण केलेले असणे किंवा नाश्ता केलेला असणे आवश्यक आहे. 

* पहिला किंवा दुसरा लसीचा डोस घेतला असेल किंवा लस घेऊन १४ दिवस पुर्ण झालेले असले पाहिजे. 

* १८ ते ६५ वर्षापर्यंत कोणीही 

* ५० किलोच्या वर वजन असलेले आवश्यक 


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.