Header Ads

कॉग्रेसचे माजी आमदार सुरेश इंगळे यांचे निधन - Former congress MLA Suresh Ingle passes away

Former congress MLA Suresh Ingle washim


माजी आमदार सुरेश इंगळे यांचे निधन 
वाशिम जिल्ह्याचा एक लोकनेता हरविला 

वाशिम दि.१३ - वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदार संघाचे कॉग्रेसचे माजी आमदार सुरेश इंगळे यांचे  दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. त्यांचेवर अकोला येथे आयकॉन हॉस्पीटला उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची काल रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने वाशिम जिल्ह्यातील लोकनेता हरविला अशी भावना कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केली. 

सन २००४ ते २००९ या कालावधीत आमदार म्हणून तसेच राज्यातील आघाडी सरकार मध्ये महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्कृष्ठ असे कार्य आपले कार्यकाळात केले. 

त्यांचेवर १३ ऑगस्ट रोजी दुपारी वाशिम येथील पद्मतिर्थ मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांचे पश्‍चात पत्नी, एक भाऊ, दोन मुले, एक मुलगी सह मोठा आप्त परिवार आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.