Header Ads

१४ ऑगस्ट हा 'विभाजन विभीषिका स्मृति दिन' 14 August Vibhajan Vibhishika Smruti Diwas - Partition Horror Remembrance Day marathi news

 

१४ ऑगस्ट हा 'विभाजन विभीषिका स्मृति दिन' 14 August Vibhajan Vibhishika Smruti Diwas - Partition Horror Remembrance Day marathi news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वर केले घोषित 

लाखो बंधू भगिनींच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा 'विभाजन विभीषिका स्मृति दिन' म्हणून ओळखला जाणार 

नवी दिल्ली दि 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी भारत-पाकिस्तान विभाजनाची आठवण केली. पंतप्रधान म्हणाले, देशाच्या फाळणीची वेदना कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बंधू भगिनींना विस्थापित व्हावे लागले आणि अनेकांना प्राणही गमवावे लागले. 14 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी 'विभाजन विभीषिका स्मृती दिन' Vibhajan Vibhishika Smruti Din म्हणून ओळखला जाणार अशी घोषणा केली. (14 August Vibhajan Vibhishika Smruti Diwas - Partition Horror Remembrance Day)

Partition Horror Remembrance Day 14 august

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून सांगितले, "फाळणीत विस्थापित झालेल्या आणि जीव गमावलेल्या आमच्या लाखो बंधू भगिनींच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस'  म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हा दिवस भेदभावाचे विष संपवण्याची प्रेरणा देईल - पंतप्रधान

पंतप्रधान मोदी म्हणाले, #PartitionHorrorsRemembranceDay चा हा दिवस, आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि दुर्भावना चा त्याग करण्यास प्रेरित करेल तसेच एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदना बळकट करेल. 

No comments

Powered by Blogger.