कु काजल धनराज पवार ने पटकावला "मिस्टर एंड मिस स्टारफेस ऑफ़ इंडिया २०२१" प्रतियोगितेत द्वितीय क्रमांक - Kajal Pawar Miss Star Face of India 2021 stood first runner up
कु काजल धनराज पवार ने पटकावला "मिस्टर एंड मिस स्टारफेस ऑफ़ इंडिया 2021" प्रतियोगितेत द्वितीय क्रमांक
कारंजा लाडचे नाव चमकविले देश पातळी वरील स्पर्धेत
कारंजा (www.jantaparishad.com) दि. 07 - कारंजा येथील कु काजल धनराज पवार (Kajal Dhanraj Pawar) हिने राष्ट्रिय स्तरावर आयोजित "मिस्टर एंड मिस स्टारफेस ऑफ़ इंडिया 2021" (mister and miss star face of india 2021) या प्रतियोगितेत मिस स्टारफेस ऑफ़ इंडिया 2021 म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त करीत कारंजाचा गौरव वाढविला असून गावाचे नाव देश पातळी वर गाजविले आहे. कु काजल ही कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले धनराज पवार यांची कन्या आहे.
अभियांत्रिकी पदवी (BE) घेतलेल्या उच्चशिक्षित काजल ने मॉडलिंग क्षेत्रात देश पातळीवर घेतलेल्या या उच्च भरारीचे सर्वत्र कौतुक होत असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे.
Post a Comment