Header Ads

जिल्हा युवा पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -District Youth Award application invited by 31st August

award


जिल्हा युवा पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    वाशिम, दि. १३ (जिमाका) : जिल्ह्यातील युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवा धोरण २०१२ नुसार जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. त्यानुसार सन २०१९-२० व सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्हास्तरीय युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रांसह पाकीटबंद लिफाफ्यात ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाशिम  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण २६ जानेवारी २०२२ रोजी केली जाणार आहेत. यामध्ये वैयक्तिक युवती व युवक यांना प्रत्येकी १० हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच संस्थेस ५० हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. सदर पुरस्कारासाठीचे अर्ज १७ ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील स्काऊट जिल्हा संघटक राजेश गावंडे (भ्र. क्र. ९९२२३६५५८७) यांच्याशी अथवा वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.