Header Ads

गर्भपात, गर्भलिंग निदान चाचणी होत असल्यास टोल फ्री क्रमांकावर कळवा - Report abortion, gynecological diagnostic test to toll free number

save the girl child, बेटी बचाओ, बेटी पढाओ Beti bachao, Beti Padhao


गर्भपात, गर्भलिंग निदान चाचणी होत असल्यास टोल फ्री क्रमांकावर कळवा

खबरी बक्षीस योजनेंतर्गत १ लाख रुपयेपर्यंत बक्षीस

    वाशिम, दि. १३ (जिमाका) : गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा अंतर्गत तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ Beti bachao, Beti Padhao कार्यक्रमांतर्गत गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणारे केंद्र अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपात होत असल्याबाबत माहिती देणाऱ्या खबऱ्यांना शासनामार्फत बक्षीस देण्यात येईल. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत अवैधरीत्या गर्भपात किंवा गर्भलिंग चाचणी होत असेल तर १८०० २३३ ४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावे. तसेच www.amachimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

    तक्रारीची खातरजमा होवून गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्यास शासनाद्वारे खबरी बक्षीस योजनेतून १ लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येईल. तसेच संबंधितांचे नाव गोपनीय राखले जाईल. त्यामुळे असे अवैधरित्या चालणारे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी याबाबतची माहिती टोल फ्री क्रमांकावर द्यावी अथवा संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.