पांजरापोळ गोरक्षण संस्थान पलाना येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न tree plantation at panjrapol palana
पांजरापोळ गोरक्षण संस्थान पलाना येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
कारंजा दि.१४ - दिनांक 13 जूलै 2021 रोजी पांजरापोळ गोरक्षण संस्थान पलाना येथे गो ग्रीन फौंडेशन व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या संयुक्त सहभागाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी संस्थेच्या परिसरात एकूण पंधरा वृक्ष मान्यवरांच्या शुभहस्ते लावण्यात आले. त्यामध्ये मुख्यत्वे वड, पिंपळ, कडुनिंब, कडू बदाम व सिसम चे वृक्षरोप लावण्यात आले.
पांजरापोळ गोरक्षण संस्थान चे अध्यक्ष माननीय ब्रिजमोहन मालपाणी, गो ग्रीन चे प्रमुख मार्गदर्शक डॉ पद्माकर मिसाळ व भा ज यु मो वाशीम जिल्हाध्यक्ष विजयजी काळे , विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरचे सचिव शेखर भाऊ बंग यावेळी प्रमुख पाव्हणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संस्थेचे संचालक आशिष तांबोळकर यांनी संस्थेविषयी माहिती दिली. तसेच संस्थेच्या प्रस्तावित कार्याची सूतोवाच केली.
गो ग्रीन चे मार्गदर्शक डॉ मिसाळ सरांनी गो ग्रीनच्या उद्देशाबद्दल बोलतांना अश्या प्रकारच्या सेवाभावी संस्थांनी वृक्षरोपणात सहभाग घेऊन वृक्षलागवड करावी ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यासाठी गो ग्रीन फौंडेशन ची टीम सदैव सोबत राहील असे सुद्धा सांगितले.
भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष विजयजी काळे यांनी आपण सुद्धा गो ग्रीन चे सदस्य असल्याचा अभिमान व्यक्त करून गो ग्रीनच्या कार्याची प्रशंसा केली. भविष्यात गो ग्रीन व गोरक्षण संस्थान यांना आपण कुठलीही मदत करू असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिषजी तांबोळकर यांनी करून शेवटी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाला पांजरापोळ संस्थेचे शालिग्रामजी भिवरकरजी, प ला ना गावचे सरपंच श्री इंगळे ,सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
गो ग्रीन फौंडेशनचे आशिष बंड, प्रवीण जोशी, गोपाल कडू, रघु वानखडे, देवरे सर, प्रज्वल गुलालकरी, डॉ राम गुंजाटे, डॉ सुशील देशपांडे, डॉ रवी ठाकरे, आंनद खेडकर, अजय बजाज, किशोर धाकतोड, रवी घाटे इ उपस्थित होते.
भा ज यु मो चे जिगणेश लोडाया, बंटी डेंडूळे, राहुल रविराव, संजय घुले, अमोल भोकरे, अमोल धोंडसे, विष्णु मुसळे उपस्थित होते.
🌱🙏🌱🙏🌱🙏🌱🙏🌱🙏
Post a Comment