इयत्ता दहावीचा निकाल उद्या १६ जुलाई रोजी - SSC Maharshtra Result 2021 on 16 July
इयत्ता दहावीचा निकाल उद्या १६ जुलाई रोजी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल
मुंबई दि.१५ - कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे रखडलेले इयत्ता दहावीचे निकाल (SSC Result Maharashtra 2021) हे उद्या दिनांक १६ जुलै २०२१ रोजी लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
कोरोनामुळे इयत्ता दहावीची परिक्षास रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाचे शिक्षण विभागाने इयत्ता दहावीचा निकाल हा अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने करण्याचे आदेश दिले व त्याअनुषंगाने नेमके मुल्यमापन कसे करावे याबाबतचे निकष ही ठरवून दिले होते. विद्यार्थ्यांसह पालक वर्गही मोठ्या आतूरतेने दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. आता उद्या रोजी हे निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाद्वारे दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण व सदर माहितीची प्रत घेता मंडळाचे खाली दिले प्रमाणे अधिकृत संकेतस्थळावरुन येणार आहे. http://result.mh-ssc.ac.in
Post a Comment