Header Ads

कारंजा लाड येथे नेहमी लाइन बंद होत असल्याने गवळीपूरा येथील नागरिकांचे हाल problem of electricity in Karanja lad



कारंजा लाड येथे नेहमी लाइन बंद होत असल्याने गवळीपूरा येथील नागरिकांचे हाल

  •  नागरिक पोहचले महावितरण कार्यालयात
  •  अधिकारी ग़ैरहजर, मोबाइल स्विचऑफ

कारंजा लाड दि. ०८ जुलै - स्थानीक गवळीपूरा परिसरा मध्ये मागील सहा महिन्या पासून शुरू असलेल्या विजेच्या लपंडाव मुळे गवळीपूरा येथील नागरिक विशेष करुन पप्पूवाले कुटुंबातील तीनशे विज ग्राहक त्रस्त झाले आहे कारण वीजेच्या लपंडाव सोबतच रात्रभर या परिसरातील विज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे लहानमुले, वृद्ध तसेच रुग्णाला खूब त्रास सहन करावा लागतो.

 


       कारंजा शहर विज महावितरण कंपनीच्या कार्यालयात अनेक वेळ तक्रारी करुन सुद्धा महावितरण चे अधिकारी व कर्मचारी कोणतीच दखल घेत नसल्यामुळे नागरिकामध्ये  रोष आहे.

      रविवारच्या रात्रिला रात्रभर हया भागातील विज पुरवठा खंडित असल्याने  गवळीपूरा येथील विज वितरण विभागाच्या ग्राहकांनी महावितरणच्या  अधिकारि व कर्मचार्याना अनेक वेळ! त्यांच्या मोबाईल वर कॉल केले तर  अधिकारि व कर्मचार्या चे मोबाइल स्विच ऑफ येत होते,तर कही कर्मचारी मोबाइल उचलत नव्वहते, म्हणून गवळीपुरा येथील १५-२० महिला व पुरुष विज ग्राहक निवेदन देण्याकरीता स्थानीक  महावितरण विज कंपनीच्या शहर कार्यालयात आले असता सकाळी११ वाजे पर्यंत   कार्यालयात एक ही अधिकारी नजर नव्हता,अधिकारीयांना मोबाइल वर कॉल केल्यावर त्यांचा मोबाइल स्विच ऑफ येत असल्याने विज ग्राहकानी निवेदन कोणाला द्यावा? असा प्रश्न प्रश्न विज ग्राहका पुढे उभा राहल्याने त्यांनी विज महावितरण कंपनी ची तक्रार सरळ जिल्हाधिकारी वाशिम यांच्याशी मोबाईल द्वारे केल्याची माहिती कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या विज ग्रहकानी येथे दिली आहे.

  


    हया भागात एका ट्रांसफॉर्मर मधुन जवळपास तीन ते चारशे विज कनेक्शन दिल्यामुळे हया ट्रांसफॉर्मर वर लोड वाडल्याने डीपी चा फ्यूज उड़त आहे असे ग्राहकांचे म्हणणे आहे,तरी संबंधित अधिकारी व कर्मचार्यानीं विज ग्राहकांचे हित लक्ष्यात घेवून विजपूर्वठा सुरळीत करून गवळीपूरा येथील नागरिकांनी निवेदन आवक जावक मध्ये देवून विनंती केली आहे. हया वेळी महिला समवेत  हुसैन पप्पूवाले,रमजान पप्पूवाले, मोहम्मद मुन्नीवाले,बाबूभाई मंजरिवाले, निसार पप्पूवाले, इरफान नौरंगबादी,रज्जाक बेनीवाले,सह हया परिसरातील विज ग्राहक  उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.