अभियांत्रिकी पदविका प्रवेश २०२१ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून २३ जुलै पर्यंत अर्ज मागविले Polytechnic Admission 2021
Polytechnic Admission 2021
अभियांत्रिकी पदविका प्रवेश २०२१
१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून २३ जुलै पर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. ०८ (जिमाका) : दहावी उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणाचा ध्यास घेवून तंत्रज्ञ, अभियंता व उद्योजक होण्यासाठी अभियांत्रिकी पदविकाच्या Polytechnic Admission 2021 प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
दहावीनंतर कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा छोटासा उद्योग उभारण्यासाठी तंत्र शिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदविका अभ्यासक्रम दहावीनंतर तीन वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. या अभ्यासक्रमाच्या विविध शाखा आहेत. यामध्ये मुख्यत्वे सिव्हील civil, ऑटोमोबाईल automobile, इलेक्ट्रीकल electrical, मॅकेनिकल mechanical अणुविद्युत व माहिती तंत्रज्ञान Information technology या मुख्य शाखांचा समावेश आहे. त्यांच्या बाकी सर्व शाखा या उपशाखा आहेत. विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे शाखा निवडून अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध शिष्यवृत्ती शासनातर्फे देण्यात येतात. त्या शिष्यवृत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी हातभार लागू शकतो. पदविका शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्याला थेट व्दितीय वर्षात पात्रतेनुसार प्रवेश घेता येतो.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. दहावीनंतरची अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रीया २३ जुलैपर्यंत वर नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदवून इ-एफसीव्दारे किंवा सुविधा केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून प्रवेश निश्चित करुन घ्यावा. अर्ज भरतांना काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनच्या समुपदेशन कक्षाचे प्रभारी प्रा. डी. के. बावणे ९६७३६१२०९८ यांचेशी संपर्क साधावा. असे वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. वि. रं. मानकर यांनी कळविले आहे.
Post a Comment