Header Ads

मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर washim district rto camp dates tahsilwise



मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर

वाशिम, दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यातील मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात येते. त्यानुसार जुलै ते डिसेंबर २०२१ या कालावधीतील मासिक शिबिरांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

कारंजा लाड येथे ५ जुलै, १९ जुलै, ४ ऑगस्ट, २० ऑगस्ट, ६ सप्टेंबर, २० सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, २० ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर, ६ डिसेंबर व २० डिसेंबर, रिसोड येथे ९ जुलै, ६ ऑगस्ट, ८ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, ८ नोव्हेंबर व १० डिसेंबर, मानोरा येथे १२ जुलै, १० ऑगस्ट, १३ सप्टेंबर, ११ ऑक्टोबर, १० नोव्हेंबर व १३ डिसेंबर, मंगरूळपीर येथे १६ जुलै, १३ ऑगस्ट, १७ सप्टेंबर, १३ ऑक्टोबर, १५ नोव्हेंबर व १७ डिसेंबर रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 

यापैकी कोणत्याही दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास दुसऱ्या कार्यालयीन दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. सकळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्जदारांनी मास्क, हातमोजे व स्वतःचे सॅनिटायझर घेवून कार्यालयात यावे. सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असे वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.