Header Ads

‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ विषयावर मोफत वेबिनार Spardha Pariksha Margdarshan Free Webinar

Spardha Pariksha Margdarshan Free Webinar

‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ विषयावर शुक्रवारी मोफत वेबिनार 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचा उपक्रम

वाशिम, दि. ०९ (जिमाका) : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ (युपीएससी, एमपीएससी व इतर) Spardha Pariksha Margdarshan (UPSC, MPSC) या विषयावर शुक्रवारी, ११ जून रोजी दुपारी ३ वाजता मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील युवक-युवतींनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

११ जून रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात पुणे येथील ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक महेश शिंदे, चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.), उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले हे मार्गदर्शन करणार आहेत. https://www.facebook.com/MaharashtraSDEED किंवा https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A  या लिंकच्या सहाय्याने वेबीनरमध्ये सहभागी होता येणार आहे.

राज्यातील युवक-युवतींसाठी वर्षभर प्रत्येक आठवड्यामध्ये दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत एकूण ५२ मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद साधण्यात येणार असून त्याद्वारे उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, दहावी-बारावी नंतरच्या संधी, इतर विविध क्षेत्रांसंबंधी माहितीविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता एकूण १२ व प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत उद्योजकता विषयक एकूण १२ असे वर्षभरामध्ये एकूण ७६ ऑनलाईन मोफत मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.