गर्भलिंग तपासणी होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन if gynecological examination is taking place give information
गर्भलिंग तपासणी होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन
तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
वाशिम, दि. १० (जिमाका) : जिल्ह्यामध्ये गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची माहिती गोपनीयरित्या प्राप्त होण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीमार्फत स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत ८४५९८१४०६० हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.
जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची गोपनीय माहिती अथवा तक्रारी नागरिकांना या हेल्पलाईन क्रमांकावर पाठविता येतील. तक्रारकर्त्यांची नावे गोपनीय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्याचे माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Post a Comment