Header Ads

सवलतीच्या क्रीडा गुणांसाठी प्राविण्य प्रमाणपत्राच्या प्रती सादर करा district sports officer appeal to principal

सवलतीच्या क्रीडा गुणांसाठी प्राविण्य प्रमाणपत्राच्या प्रती सादर करा

जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांचा आवाहन

वाशिम, दि. ०८ (जिमाका) : इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यासाठी त्यांचे ८ वी आणि ९ वी मधील खेळांतील प्राविण्यपत्र आणि इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासाठी त्याचे इयत्ता अकरावीमधील खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्रांच्या प्रती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात २५ जून २०२१ पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुले शैक्षणिक सत्रच सुरु झालेले नसल्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांचा खेळामध्ये सहभाग होवू शकलेला नाही. त्यामुळे सन २०२१-२१ या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता ८ वी आणि ९ वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यास सन २०२०-२१ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच सन २०२०-२१ या वर्षात इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता १२ वी पूर्वी इयत्ता ११ वीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर परीक्षेस सन २०२०-२१ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांना आदेशित करणायत आले आहे.

या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला निर्देश प्राप्त होताच सवलतीच्या गुणांसाठी प्रस्तावांची छाननी करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतील. तरी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी सन २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे अनुक्रमे इयत्ता ८ वी ते ९ वी मधील खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राच्या प्रती मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याद्वारा साक्षांकित करून प्रस्ताव दोन प्रतीत २५ जून २०२१ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे सादर करण्याचे आवाहन श्री. उप्पलवार यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.