Header Ads

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन pm fme PM Formlisation of Micro Food Processing Enterprises Scheme

Pm fme

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  • सोयाबीन प्रक्रिया उद्योग, लाकडी तेलघाना उद्योगासाठी लाभ
  • सोयाबीन, तेलवर्गीय पिक प्रक्रिया उद्योगांना मिळणार गती

वाशिम, दि. १८ (जिमाका): जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, तेलवर्गीय पिक प्रक्रिया उद्योगांना यामुळे गती मिळणार असून असंघटीत क्षेत्रातील लाकडी तेलघाना, सोयाबीन प्रकिया उद्योगांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभार्थी, बचतगट, शेतकरी कंपनी या योजनेचा लाभ घेवू शकतील. सोयाबीन प्रक्रिया उद्योग स्तरवृद्धी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. नवीन उद्योग असल्यास सोयाबीन प्रक्रियेसाठी तर जुना उद्योग असल्यास सोयाबीन, करडी लाकडी तेलघाना, खाद्य पदार्थ यासाठी लाभ घेता येईल.

वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, पासिंग सर्टिफिकेट, राहत्या घराचे वीजबिल, बँक पासबुक मागील सहा महिन्यांची छायांकित प्रत, उद्योग ज्या जागेत करणार त्याचे घरपत्रक उतारा, भाडे करारपत्र, मशिनरी कोटेशन, नवीन बांधकाम करणार असल्यास सातबारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

बचतगटासाठी बचतगट स्थापनेवेळीच ठराव, बँक पासबुक छायांकित प्रत, सर्व सदस्यांचे आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, कोटेशन, जागेचा भाडेकरार, उद्योग ज्या जागेत करणार त्याचे घरपत्रक उतारा, मशिनरी कोटेशन, कर्ज काढण्यासाठीचा गटाचा ठराव, नवीन बांधकाम करणार असल्यास सातबारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

वैयक्तिक लाभासाठी https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शेतकरी कंपनी, बचतगटांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृषि विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.

No comments

Powered by Blogger.