थोड्याश्या पावसात कारंजाचे रोड बनले गटार - कारंजा नगर परिषदचे अक्षम्य दुर्लक्ष्याने स्वच्छतेचे तीनतेरा karanja nagar parishad road banle gatar
![]() |
१) स्टेट बैंक ते छत्रपति शिवाजी महाराज चौक पर्यन्त गटार बनलेले रोड |
थोड्याश्या पावसात कारंजाचे रोड बनले गटार
कारंजा नगर परिषदचे अक्षम्य दुर्लक्ष्याने स्वच्छतेचे तीनतेरा कोरोना महामारीचे काळात स्वच्छतेकडे लक्ष्य देणे गरजेचे कोरोनाच्या महामारीत होऊ शकतो विविध आजारांचा प्रसार
कारंजा (जनता परिषद) दि.०८ - दि.०६ जुन रोजी आलेल्या एकाच पावसाने कारंजा नगर परिषदच्या स्वच्छता विभागाचा संपूर्ण कार्यभार जणू रोडवरच आणून ठेवला होता. शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेले स्टेट बँक समोरील रोड ते शहरातील सर्वात महत्वाचे शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेल्या चौकापर्यंतचे रस्ता यामध्ये नेमका रस्ता कोणता व नाली कोणती हा प्रश्न ये-जा करणार्या व उपस्थित असलेल्या नागरिकांना पडला होता. संपूर्ण नाल्यांचे घाण पाणी हे रस्त्यांवरुन ओसंडून वाहत होते. स्टेट बॅक रोडवर मोठ्या प्रमाणावर लघू व्यावसायीक तसेच महत्वाच्या बँका तसेच रहिवासी यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.
![]() |
२) भगवान महावीर चौक ते महात्मा फुले चौक पर्यन्त गटार बनलेले रोड |
तसेच भगवान महावीर चौक ते महात्मा फुले चौक पर्यंतचे रस्त्यावरही हेच चित्र होते. इतकेच नव्हे तर या रोडवर तर हे नित्याचेच झाले असल्याचे येथील रहिवासी नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे. भ.महाविर चौक ते महात्मा फुले चौक येथेही काही व्यवसायीक व मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती असल्याने हा ही वाहता रोड आहे.
घाण पाण्यामुळे व साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता
नाल्यांमध्ये घाण साचल्याने संपूर्ण घाणयुक्त पाणी हे रोडवरुन वाहत जाते. इतकेच नव्हे तर नाल्यांमधून पाणी वाहून जात नसल्याने रोडवर कित्येक तास हे पाणी साचून राहते. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातल्या त्यात दि.०६ जुन रोजी बरसलेल्या पावसाच्या सरी ह्या तर मान्सून पूर्व सरी होत्या, भर पावसाळ्यात तर हे चित्र जास्तच विदारक राहणार हे सांगण्यास भविष्यकाराची आवश्यकता न लगे. मान्सून पुर्व ही परिस्थिती असेल तर येणारे ४ महिने हे रामभरोसे च राहतील असेही मत काही कारंजेकर व्यक्त करीत आहेत.
घाण पाण्यामुळे व साचलेल्या पाण्यामुळे डास, किटक यांचा प्रादूर्भाव होऊन त्यापायी डेंगू, मलेरिया सारखे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे वेळोवळी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगत असतात. त्यातल्या त्यात कोरोनाच्या या महामारीचे काळात याचे परिणाम जास्त जाणवू शकतात.
तरी प्रशासनाचे मुख्य या नात्याने मुख्याधिकारी यांनी तसेच जनतेचे सेवक नव्हे तर किमान समाजसेवक म्हणून तरी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी इतरही अनेक बाबींप्रमाणेच स्वच्छतेकडेही थोडे लक्ष्य द्यावे जेणे करुन पावसाळ्यात घाण पाणी नालीतूनच वाहवे व रोडची किमान नाली तरी होऊ नये अशी सामान्य कारंजेकरांची सामान्य मागणी आहे.
Post a Comment