Header Ads

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 30 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत - student scholarship mahadbt portal

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 30 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत

वाशिम, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०२०-२१ या वर्षात शिष्यवृत्ती व इतर योजनांचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत ३० जून २०२१ अशी निश्चित करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, विमुक्त जाती- भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलला फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्ह्यातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वरील तारखेपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करावे.

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित राहिलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याचा कालावधी सुद्धा ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात आला आहे. तरी वरील प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी (फ्रिशिप) व इतर योजनांच्या अर्जावर देखील ३० जूनपर्यंत कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास अवगत करुन तसेच महाडीबीटी पोर्टलच्या https://dbtworkflow.mahaonline.gov.in या पडताळणी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रिशिप) योजना व इतर ऑनलाइन झालेल्या योजनांच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून फी वसूल केल्यास संबंधित महाविद्यालयाविरुद्ध शासन निर्णयानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.