Header Ads

बियाणे, खते, कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके गठीत - Bharari squads formed to curb black market of seeds, fertilizers, pesticides

बियाणे, खते, कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके गठीत

जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना

जिल्हा व तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे संपर्क खाली दिले प्रमाणे

वाशिम, दि. १५ (जिमाका) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषि विभागामार्फत जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. कृषि निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांच्या ताकारींची तपासणी सुद्धा या पथकांकडून केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा कृषि विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली आहे.

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे, खते व कीटकनाशके आदी कृषि निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, यासाठी कृषि विभागामार्फत स्थापन करण्यात आली भरारी पथके आवश्यक कार्यवाही करतील. कृषि निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यात व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने अडचणी व तक्रारी नोंदविण्यासाठी या नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. दरम्यान संपर्क साधता येईल. नियंत्रण कक्षांची माहिती खालीलप्रमाणे आहे :-

जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियान्त्रंक कक्ष : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय- कृषी उपसंचालक एन. आर. ठोंबरे (भ्रमणध्वनी क्र. ९४२१९३६६९१), कृषी सहायक डी.पी. आरु (भ्रमणध्वनी क्र. ९४०४२५२६७९), जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहिम अधिकारी सी. पी. भागडे (भ्रमणध्वनी क्र. ८८०५८१०५१८), ग्राम विकास अधिकारी एस. के. इंगळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३२०२२८५).

उपविभागीय स्तरावरील कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष : तंत्र अधिकारी श्री. पल्लेवाड (भ्रमणध्वनी क्र. ७७४४८२२००१), कृषि सहायक श्रीमती एन. एस. धांडे (भ्रमणध्वनी क्र. ९४२०१२४९५४).

वाशिम तालुका : तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ (भ्रमणध्वनी क्र. ९४२३१२८६२६), कृषी सहायक संगीता टाकरस (भ्रमणध्वनी क्र. ७५८८७९३६१७, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. पी. भद्रोड (भ्रमणध्वनी क्र. ९९७५७०११५५), विस्तार अधिकारी ए. एस. मुळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३७३५३४६).

मालेगांव तालुका - तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर (भ्रमणध्वनी क्र. ९४०५९६६९६६), कृषी अधिकारी एस. एल. अवचार (भ्रमणध्वनी क्र. ९८२२७६३९०५), कृषी सहायक श्री. मानवतकर (भ्रमणध्वनी क्र. ९९२२२८४८५४), विस्तार अधिकारी बी. एन. ठाकरे (भ्रमणध्वनी क्र. ९६८९६६०५०९).

रिसोड तालुका - तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप (भ्रमणध्वनी क्र. ९८३४४५३०३३), कृषी अधिकारी रवींद्र धनेकर (भ्रमणध्वनी क्र. ९४२१०१३०४१), कृषी अधिकारी आर. एन. जोशी (भ्रमणध्वनी क्र. ७८७५५८४२४३), पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गावंडे (भ्रमणध्वनी क्र. ९७६६४९६३०५).

मंगरुळपीर तालुका - तालुका कृषी अधिकारी रविंद्र इंगोले (भ्रमणध्वनी क्र. ९४०४०९३९८६), कृषी अधिकारी आकाश इंगोले (भ्रमणध्वनी क्र. ९४२०३५३३०९), पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी. एस. शेळके (भ्रमणध्वनी क्र. ९२८४५६६३०९), विस्तार अधिकारी आर. बी. वाडणकर (भ्रमणध्वनी क्र. ७५८८०९०४५०).

मानोरा तालुका - तालुका कृषी अधिकारी के. डी.  सोनटक्के (भ्रमणध्वनी क्र. ९४०४३३८२१६), कृषी पर्यवेक्षक एस. एन. मनवर (भ्रमणध्वनी क्र. ९३२९११८९३८), पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. एस. मकासरे (भ्रमणध्वनी क्र. ९९२१४७३९५५), विस्तार अधिकारी (भ्रमणध्वनी क्र. ९०११५५५३९४.

कारंजा तालुका - तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके (भ्रमणध्वनी क्र. ९४२२९२१०९०), कृषी अधिकारी प्रमानंद राऊत (भ्रमणध्वनी क्र. ९४८४९२४०८०), पंचायत समिती कारंजाचे कृषी अधिकारी पी. एस. देशमुख (भ्रमणध्वनी क्र. ७५८८७६३४२७), विस्तार अधिकारी एस. व्ही. कोल्हे (भ्रमणध्वनी क्र. ९८८१९४८२२५).

No comments

Powered by Blogger.