Header Ads

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार उद्या मार्गदर्शन - Pediatric Task Force - How to prevent corona in children ?

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स  करणार उद्या मार्गदर्शन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या होणाऱ्या कार्यक्रमात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांचा सहभाग

Facebook व Youtube वरील लिंक वर थेट पाहता येईल 

Pediatric Task Force - How to prevent corona in children ?

मुंबई दि.२२ – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना (Pediatric Task Force - How to prevent corona in children ? ) सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे रविवार दि. २३ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.

डॉ.सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.

हा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून फेसबुक Facebook – https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि युट्यूब Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ  येथे थेट पाहता येणार आहे.

या कार्यक्रमात राज्यातील अधिकाधिक बालरोगतज्ञांनी ऑनलाईन लिंकद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन बालरोगतज्ञ संघटनेचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर यांनीदेखील केले आहे.

No comments

Powered by Blogger.