Header Ads

वाशिम दि ०४ मे २०२१ - कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा - जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आवाहन - Donate blood before taking the corona vaccine

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा - जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आवाहन

वाशिम, दि. ०४ (जिमाका) : जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीचे दोन डोस घेतल्याच्या २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे १८ वर्षांवरील व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करून इतरांचे जीव वाचविण्यासाठी मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुडवडा भासतो, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. थालासेमिया, सिकलसेल, हिमोफेलीया या आजाराने ग्रस्त रुग्णांना दर पंधरा दिवसाला रक्त घ्यावे लागते. तसेच गर्भवती स्त्रिया व इतर रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे १८ वर्षांवरील व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करून वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जीवन अमृत शासकीय रक्तपेढीला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.