Header Ads

वाशिम, दि. २५ - जिल्ह्यात काही सवलतींसह १ जूनपर्यंत कडक निर्बंध कायम dm order restrictions till 1 june


 जिल्ह्यात काही सवलतींसह १ जूनपर्यंत कडक निर्बंध कायम

वाशिम, दि. २५ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध काही सवलतींसह १ जून २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २५ मे रोजी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात १९ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार काही सवलतीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच २० मे आणि २४ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार आणखी काही बाबींना सवलत देण्यात आली आहे. या सवलतींसह कडक निर्बंध १ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

No comments

Powered by Blogger.