Vardhapan Din

Vardhapan Din

वाशिम दि.०४ मे २०२१ - जिल्ह्यात ‘एटीएम’ मशीनच्या वेळेमध्ये बदल - change in timings of ATM

वाशिम जिल्ह्यात ‘एटीएम’ मशीनच्या वेळेमध्ये बदल

ग्राहकांना खाते क्रमांकाच्या आधारे बँकेत प्रवेश

वाशिम, दि. ०४ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या नियमावलीमध्ये अंशतः बदल करून आता जिल्ह्यातील बँका व ‘एटीएम’ मशीनच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. आता बँका सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि एटीएम मशीन सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार ग्राहकांना प्रवेश देण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ४ मे रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ० अथवा १ असल्यास सदर ग्राहकांना बँकेत केवळ सोमवारी प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे खाते क्रमांकाचा शेवटचा अंक २ किंवा ३ असल्यास मंगळवारी, ४ किंवा ५ असल्यास बुधवारी, ६ किंवा ७ असल्यास गुरुवारी आणि ८ किंवा ९ असल्यास शुक्रवारी बँकेत प्रवेश दिला जाईल. तसेच प्रत्येक महिन्यातील पहिला, तिसरा व पाचवा शनिवार बँकेच्या अंतर्गत कामकाजाचा दिवस राहील. त्यादिवशी ग्राहकांना त्यांच्या कामासाठी बँकेत प्रवेश असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


बँक प्रवेशासाठी ग्राहकांना खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकावरून ठरवून दिलेले दिवस

वार

खाते क्रमांकाचा शेवटचा अंक

सोमवार

० व १

मंगळवार

२ व ३

बुधवार

४ व ५

गुरुवार

६ व ७

शुक्रवार

८ व ९


Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells